Friday, May 31, 2024
Homeनंदुरबारमोहिदा शिवारात विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

मोहिदा शिवारात विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

शहादा Shahada| ता.प्र. 

तालुक्यातील  मोहिदा शिवारातील एका शेतातील विहिरीत (well) बुधवारी सकाळी अनोळखी महिलेचा (woman’s body) मृतदेह तरंगतांना आढळूनआला. हा मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटली नाही. त्यामुळे मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

एक विवाह असाही…बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील मोहीदा शिवारात शेतातील अनरद बारीच्या पुढे मित्तल मका फॅक्टरीलगतच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.

मयताच्या वर्णनानुसार वय सुमारे ५० ते ५५ वर्ष, रंग गोरा, उंची ५ फुट, अंगात हिरव्या रंगाची साडी, दोन्ही पायात साधे चाळ अशा वर्णनाचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत मिळून आला आहे.

बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरलीअ‍ॅड. चव्हाणांच्या पोलीस कोठडीसाठी पुनर्विलोकन अर्ज मेहरुण तलावात बुडून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

तीन-चार दिवसापासून या महिलेचा मृतदेह विहिरीत पडलेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कन्हैय्यालाल पाटील यांनी पोलीसांना माहिती दिली.

मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले.पुढील तपास सारंगखेडा पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या