Saturday, May 25, 2024
Homeनगरपोळ्यानिमित्त शेळ्या धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

पोळ्यानिमित्त शेळ्या धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

आंबी | वार्ताहर

राहुरी तालुक्यातील केसापूर येथील अविवाहित युवक ऋतिक संजय पुंड (वय २१) हा बैलपोळ्यानिमित्त प्रवरा नदीपात्रात शेळ्या धुण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पाय घसरून पाण्यात बुडाल्याने ऋतिकचा करून अंत झाला.

- Advertisement -

ऋतिक पुंड हा अतिशय कष्टाळू व होतकरू तरुण होता. श्रीरामपूर येथे मित्राच्या गॅरेजमध्ये फिटरकाम करून व वडिलाच्या हाताखाली सायकल पंचरचे दुकान सांभाळून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता. तसेच आई आजारी असल्याने नगर येथे उपचारसाठी गेली होती.

ऋतिकच्या मागे आई, वडील, एक भाऊ व बहिण असा मोठा परिवार आहे. केसापूर येथील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून ऋतिकला नदीपात्रातून बाहेर काढले. लागलीच श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अगोदरच मृत्यू झाल्याचे घोषित केले. ऋतिकच्या जाण्याने केसापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर केसापूर येथे ऋतिक पुंड याचेवर सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवरा पंचक्रोशीत नदीला पाणी कमी असताना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्या मार्गाने गाढवं, मोटार सायकल वर कॅरेट लावून आदी मार्गाने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. त्यामुळे नदीकिनारी मोठ्या प्रमाणत खड्डे झाले असून अशाच खड्ड्यात पाय घसरून ऋतिक पुंड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. त्यामुळे दोष कुणाला द्यावा असा सवाल विचारला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या