Sunday, May 19, 2024
Homeजळगावधावत्या रेल्वेखाली झोकून देत तरुणाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देत तरुणाची आत्महत्या

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

धावत्या रेल्वेखाली (runner railway) झोकून देत देविदास भावराव कोळी (वय-35, रा. तानाजी मालूसरे नगर) या तरुणाने (youth) आत्महत्या -suicide= केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तरुणाच्या खिशातील ड्रायव्हींग लायसन्वरुन (driving license) त्यांची ओळख (identity) पटली असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

Photos # दूध संघासाठी अडीच लाखापर्यंत पोहोचला फुलीचा भाव

शहरातील असोदा रोडवरील तानाजी मालुसरे नगरात देविदास कोळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ते घरातून आपल्या दुचाकीने निघून गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी असोदा रेल्वे गेटजवळ दुचाकी लावून त्यानी जळगाव-भादली रेल्वेलाईनवरील खांबा क्र. 422 जवळ धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्यातील विलास शिंदे, सुधाकर शिंदे, साहेबराव पाटील, माणिक सपकाळे यांना कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

VISUAL STORY: अशी होती एक ‘लावणीसम्राज्ञी’

ड्रायव्हींग लायसन्वरुन पटली ओळख

तालुका पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मात्र, मृतदेहाची ओळख पटत नव्हती.मृतद तरूणाची अंगझडती घेतल्यानंतर पँटच्या खिशात पाकिट सापडले. त्यात मृत तरूणाचे ड्रायव्हींग लायसन्स व काही फोटो मिळून आल्याने त्यावरुन त्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांना मृत तरूणाची आसोदा रेल्वे गेटजवळ दुचाकी सुध्दा मिळून मिळून आली.

Visual Story # नुसरतच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर घातलीय धुमाकूळVISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !

नातेवाईकांकडून सुरु होता तरुणाचा शोध

मयत देविदास यांची ओळख पटावी म्हणून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता. दरम्यान, चौघुले प्लॉट परिसरात पोलिस चौकशी करित असताना त्यांना मृत तरूणाचे नातेवाईक भेटले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर मृतदेह ओळखला. त्यानंतर मृतदेह हा देविदास कोळी यांचा असल्याचे समोर आले. शनिवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुधाकर शिंदे हे करीत आहे.

Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

- Advertisment -

ताज्या बातम्या