Wednesday, April 30, 2025
Homeनाशिकघोटी-सिन्नर महामार्गावरील धामणी भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

घोटी-सिन्नर महामार्गावरील धामणी भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

इगतपुरी | प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने आज सकाळी भीषण अपघात झाला. या ट्रकने एका मोटार सायकलला टक्कर दिली असुन या अपघातात एका खाजगी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

ही घटना इगतपुरी तालुक्यातील धामणी परिसरात घडली असून शिवाजी विष्णू ठोके, वय ३५ वर्ष, रा. अधरवड असे अपघातग्रस्त दुर्दैवी युवकाचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की युवकाच्या शरीराचे दोन भाग झाले असून या युवकाच्या शरीराचा अर्धा भाग वीस ते पंचवीस फुटावर फरपटत नेला होता. यावेळेस ट्रक चालकाने ट्रक सोडून पलायन केले.

अपघातस्थळी वाहतुकीची कोंडी झाल्यावर त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतुक पोलीस पोहचल्यावर वाहतुक सुरळीत करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी हल्ला चढवला, या हल्ल्यामध्ये घोटी ग्रामीण महामार्गचे पोलीस कर्मचारी किरण आहेर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या संशयतांचा शोध घेत होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ३० एप्रिल २०२५ – लोकांची साथ आवश्यक

0
सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केला जात असल्याचे सरकारकडून वेळोवेळी सांगितले जाते. तथापि असे प्रयत्न लोकांच्या इच्छाशक्तीशिवाय प्रभावी...