Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजधबधब्याजवळील डोहात बुडून तरुणाचा मृत्यू

धबधब्याजवळील डोहात बुडून तरुणाचा मृत्यू

दहिवड | मनोज वैद्य

- Advertisement -

आज गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मालेगाव येथील काही तरुण देवळा तालुक्यातील दहिवड व चिंचवे गावाच्या सरहद्दीवरील चोरचावडी धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी आले होते. त्यातील काही तरुण हे धबधब्याजवळील डोहात पोहण्याचा आनंद घेत असताना राहुल सोमनाथ काळे वय १८ राहणार गवळीवाडा, मालेगाव कॅम्प याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी तो बुडाला.

YouTube video player

सदर घटनेची माहिती त्या तरुणाच्या नातेवाईकांना व देवळा पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी हजर होत तरुणाला शोधण्यासाठी शोधकार्य सुरू केले. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मालेगाव येथील अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांना सदर तरुणाचा मृतदेह सदर डोहात आढळून आला.

सदर मृतदेह मालेगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देवळा पोलिसांच्या वतीने देण्यात आली असून देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर, पोलीस नाईक योगेश जामदार व त्यांचे सहकारी हे पुढील तपास करीत आहेत. आज घडलेल्या घटनेमुळे मागील चार वर्षांपूर्वी याच ठिकाणी वडाळीभोई येथील ३ तरुण पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेची स्थानिकांना आठवण झाली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...