Wednesday, April 30, 2025
Homeधुळेदोन दुचाकींच्या धडकेत बोराडीतील तरूण ठार

दोन दुचाकींच्या धडकेत बोराडीतील तरूण ठार

धुळे । dhule। प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील वाडी ते नांदर्डे रस्त्यावर भरधाव दुचाकीने (bike) समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक (strike) दिली. त्यात न्यु बोराडीतील तरूण ठार (Young man killed) झाला. धडक देणार्‍या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisement -

सुकलाल वाहर्‍या पावरा (वय 27 रा. न्यु बोराडी ता. शिरपूर) असे मयताचे नाव आहे. तो शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने जात होता. त्यादरम्यान त्याला वाडी ते नांदर्डे रस्त्यावरील ज्ञानेश्वर प्रकाश पाटील यांच्या शेतासमोर समोरून भरधाव वेगान येणार्‍या एमएच 19 बीव्ही 1209 क्रमांकाच्या दुचाकीवरील चालक विनोद सिताराम माळी (वय 32 रा. दसेगाव ता. चाळीसगाव) याने जोरदार धडक दिली.

त्या सुकलाल पावरा याचा मृत्यू झाला. तर विनोद आणि त्याच्या दुचाकीवर मागे बसलेला साजन भिमराव मोहिते (वय 20) हे दोघे गंभीर जखमी झाले.

याबाबत वाहर्‍या विरजी पाडवी (वय 55 रा. न्यु बोराडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी विनोद माळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना पवार करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया;...

0
मुंबई । Mumbai उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत दोन्ही नेत्यांनी सकारात्मक संकेत दिल्याने मनसे-ठाकरे...