धुळे। सौंदाणे । Dhule
- Advertisement -
मुंबई (mumbai) येथे अग्नीवीर (agniveer) भरतीसाठी गेलेला धुळे तालुक्यातील वडजाई येथील तरूण रेल्वेच्या धडकेत ठार झाला आहे. ही दुर्देवी घटना आज मुंब्रा रेल्वे स्टेशवर घडली. घटनामुळे गावात हळहळ व्यक्त केली आहे.
धुळे तालुक्यातील वडजाई, सौंदाणे, बाभुळवाडी येथील 20 तरूण अग्नीवीर सैन्य भरतीसाठी काल मुंबई येथे निघाले होते. आज सकाळी ते मुंब्रा रेल्वे स्टेशनवर उतरले. त्यादरम्यान वडजाई येथील तरूण रामेश्वर भरत पाटील यास एका जलदगती रेल्वेने धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला.
रामेश्वर याचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याचा सराव देखील सुरू होता. पंरतू त्यापुर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्याच्या मृत्यूचे वृत्त गावात धडकताच कुुटुंबियांनी एकाच आक्रोश केला. तर गावात शोककळ पसरली आहे.