Saturday, April 26, 2025
Homeजळगावलव्ह जिहादच्या संशयावरुन तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

लव्ह जिहादच्या संशयावरुन तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

जळगाव- jalgaon

हॉटेलमध्ये मैत्रिणीचा वाढदिवस (friend’s birthday) साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाला (young man) लव्ह जिहादच्या (Love Jihad) संशयावरून (suspicion)  आठ ते दहा तरुणांनी (youth) लोखंडी रॉड शोएब नासीर पठाण (Shoaib Nasir Pathan) याच्या डोक्यात टाकून बेदम मारहाण (brutal beating) करून गंभीर जखमी (seriously injured) केल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोहाडी (Mohadi) येथील एका हॉटेलमध्ये (Hotel) घडली. याप्रकरणी शोभा चौधरी यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध (Against eight to ten people) रामानंदनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.  दरम्यान, पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. 

- Advertisement -

एका महाविद्यालयात शिक्षण घेणारे तरुण तरुणी एका मैत्रिणीचा  वाढदिवस साजरा करण्यासाठी मोहाडी  रस्त्यावरील एका हॉटेलात गुरुवारी रात्री 8 वाजता आले होते.  त्यावेळी हॉटेलात रुमाल बांधलेले चार ते पाच तरुण व स्कार्फ बांधलेल्या तीन ते चार तरुणी शोभा चौधरी यांच्यासह आल्या. 

 त्यांनी तरुण-तरुणींना त्यांचे ओळखपत्र मागितले.  यानंतर मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला शोएब पठाण याला  लव्ह जिहादच्या संशयावरून आलेल्या टोळीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकाने शोएबच्या डोक्यात रॉड टाकल्यामुळे शोएब गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर  पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी शोएब  याला तात्काळ रुग्णालयात हलविले. याप्रकरणी एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून शोभा चौधरी यांच्यासह मारहाण करणाऱ्या आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहा संशयितांना घेतले ताब्यात

 गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मारहाण करणाऱ्या हरीश चौधरी, अतुल पाटील, निवृत्ती पाटील, भावेश वारुळे, मोहित पाटील ,निलेश माळी यांना ताब्यात घेतले आहे. 

या पथकाने राबविले अटकसत्र

सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, पोना प्रवीण जगदाळे, रेवानंद साळुंखे, पोलीस शिपाई रवींद्र चौधरी यांनी आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...