Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik Crime News : इंडियन नेव्हीत नाेकरीचे आमिष दाखवून तरुणास तीन लाखांचा...

Nashik Crime News : इंडियन नेव्हीत नाेकरीचे आमिष दाखवून तरुणास तीन लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय नाैदलात (Indian Navy) चांगल्या पाेस्टवर नाेकरी लावून देताे असे सांगून एका महिलेस पुरुषाने तरुणाच्या कुटुंबास तीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. बनावट कागदपत्रे, प्रमाणपत्रे दाखवून दाेघांनी हे पैसे उकळले. नाेकरी लागलीच नसल्याने फसवणूक झाल्याचे कळाल्यावर अखेर कुटुंबाने न्यायालयात (Court) धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने मुंबई नाका पाेलिसांना (Mumbai Naka Police) गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : कांदा व्यापाऱ्यास १५ लाखांचा गंडा

याबाबत अधिक माहिती अशी की, अरविंद हिरालाल विश्वकर्मा(वय ३०) व ज्याेती गांगुर्डे(वय २६, दाेघे रा. गुरुकृपा अपार्टमेंट, श्रीरामनगर, आडगाव शिवार, हल्ली रा. बेलापूर, नवी मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. दाेघांनी विवाह केल्याचे समाेर येते आहे. कमलेश वालजीभाई पटेल (वय ५३, रा. प्रमेध अपार्टमेंट, कल्पतरुनगर, अशाेका मार्ग, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, विश्वकर्मा व गांगुर्डे यांनी संगनमताने पटेल यांच्याशी ओळख वाढविली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : खंडणीखाेर बनला ‘कार डिलर’; भागवत बंधुंच्या अपहरणातील सराईत गुन्हेगार अटकेत

त्यानंतर त्यांच्या मुलास ‘इंडियन नेव्ही’त संरक्षण दलाची केंद्रीय नाेकरी (Central Job) आणि तीसुद्धा चांगल्या पाेस्टवर लावून देण्याचे अमिष दाखविले. आमची थेट संरक्षण दलात ओळख आहे, असे सांगून त्याबाबतचे कागदपत्रे व फाेटाेज पटेल यांना दाखविले. पटेल यांचा विश्वास बसल्याने त्यांनी मुलाचे कागदपत्रे व फाेटाेज दाेघांना दिले. त्यानंतर या संशयितांनी त्यांना नाेकरीसाठी फार स्पर्धा असते. थाेडेफार पैसे अधिकारी व तेथील क्लर्कला द्यावे लागतील, असे सांगून पैशांची मागणी केली. तसेच २४ जानेवारी ते २२ मार्च २०१९ या कालावधीत एकूण तीन लाख रुपये घेतले.

हे देखील वाचा : अधिकार्‍यांचा दृष्टीकोन यापुढे संपूर्ण सरकारी असला पाहिजे – गृहमंत्री अमित शाह

दरम्यान, संशयित पैसे (Money) घेऊन पसार झाले. त्यांना संपर्क करुनही त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे, पटेल यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. अखेर सुनावणीअंती न्यायालयाने वरील दाेघांवर फसवणूकीसह (Fraud) अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश मुंबईनाका पाेलिसांना दिले. त्यानुसार उपनिरीक्षक निसार शेख तपास करत आहेत. संशयितांचा शाेध सुरु आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या