Tuesday, March 25, 2025
Homeजळगावजळगावात किरकोळ कारणावरून तरुणाचा खून ; तीन संशयित आरोपींना अटक

जळगावात किरकोळ कारणावरून तरुणाचा खून ; तीन संशयित आरोपींना अटक


जळगाव-

शहरातील सिंधी कॉलनी आणि नाथवाडादरम्यान एकाची किरकोळ कारणावरून धारधार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ३ संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी अटक केली आहे.

- Advertisement -

ललित प्रल्हाद वाणी (वय ४५, रा. नाथवाडा, जळगाव) असे मयताचे नाव आहे. ललित हा सुप्रीम कंपनीत कामगार असून तो दुसरी शिफ्ट ३ ते ११ वा.आटोपून घरी परतत होता. इच्छादेवी चौकात रात्री ११.४० वाजता उतरल्यानंतर तो ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या नाथवाडा परिसरातील घराकडे पायी येत असताना नाथवाडा परिसरात आल्यावर एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून तो जात असताना त्याला संशयित आरोपी कमल किरण बागडे (वय २०, रा. कंजरवाडा, जळगाव) हेमंत उर्फ हुल्या सपकाळे (वय २०, तुकारामवाडी, जळगाव) व युवराज कैलास पाटील (वय १८, जानकी नगर जळगाव) हे दिसले.

ललित वाणी आणि या तिघा संशयित आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. या वादावादीतून तिघांनी त्याला मारहाण केली तर एकाने मानेवर थेट चाकूने वार केला. एका वारमध्येच ललित वाणी हा जमिनीवर कोसळला. त्यावेळेला दोघे संशयित आरोपी हे पळून गेले. सकाळी पाच वाजेनंतर येणार्‍या जाणार्‍या लोकांना ललित वाणीचा मृतदेह पडलेला दिसला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, संशयित आरोपी कमल बागडे, हेमंत सपकाळे, युवराज पाटील यांना अटक करण्यात आली आहे. ललित वाणी यांच्या पत्नी मेघा ललित वाणी (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एपीआय आसाराम मनोरे, पीएसआय रविंद्र चौधरी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, छगन तायडे, विनोद ऑस्कर, सचिन मुंडे, राजेंद्र कांडेकर, रतीलाल पवार, सिध्देश्वर डापकर यांनी संशयित आरोपींना अटक केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...