Wednesday, March 26, 2025
Homeधुळेडुक्कर आडवे आल्याने दुचाकी घसरून तरूण ठार

डुक्कर आडवे आल्याने दुचाकी घसरून तरूण ठार

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील भगा मोहन नगरातील रस्त्यावर अचानक डुक्कर आडवे आल्याने भरधाव दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात तरूण ठार तर एक जखमी झाला आहे. काल रात्री 12.20 वाजेच्या सुमारास हा अपघात

- Advertisement -

गोपाल सुरेश वराडे (वय 29 रा. पवन नगर, कॉटन मार्केटच्या मागे, धुळे) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो सचिन बाबुलाल मराठे (रा. 50 खोली, कॉटेन मार्केट मागे, धुळे) यांच्या एमएच 18 बीडब्ल्यु 8466 क्रमांकाच्या दुचाकीवर मागे बसून नटराज टॉकीज येथून पवन नगर येथे घरी येत होता. त्यादरम्यान भगा मोहन नगरातील शिव महिमा अपार्टमेंटजवळ रोडवर दुचाकीचालक सचिन याने दुचाकी भरधाव चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. तसेच रस्त्यात अचानक डुक्कर आल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात गोपाल हा ठार झाला. तर सचिन जखमी झाला. याबाबत जयवंत रमेश वराडे याच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालक सचिन मराठे यांच्यावर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉँ सैंदाणे हे पुढील तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कोहोर गटात शिवसेना ठाकरे गटाचे नंदुभाऊ गवळी यांचा भाजपात प्रवेश

0
कोहोर | वार्ताहरपेठ तालुक्याच्या शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार पडून कोहोर मविआ गटाचे विधानसभा प्रमुख नंदूभाऊ गवळी यांच्या गट, गणातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला...