Saturday, July 27, 2024
Homeधुळेपिंपरखेडे बारीत तरूणाची गोळ्या झाडून हत्या

पिंपरखेडे बारीत तरूणाची गोळ्या झाडून हत्या

धुळे । dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपरखेड्याच्या बारीत धुळ्यातील तरूणाची (young man) गोळ्या झाडून (shot dead) व चाकुने वार करीत निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली. हत्येचे कारण गुलदस्त्यात असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात हल्लेखोरांवर धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

यशवंत सुरेश बागुल (रा.मिलिंद सोसायटी, कुंभार नगर, साक्री रोड, धुळे) असे मयताचे नाव आहे. बागुल यांनी उभंड नांद्रे येथे शेती घेतली होती. ते आठवड्यातून दोन-चार दिवस तेथेच मुक्कामी राहून शेती सांभाळत होते. काल दि. 25 रोजी सायंकाळी ते शेतमजूर शोधण्यासाठी मामेभाऊ पंकज राजेंद्र मोहिते यांच्यासोबत पिंपरखेडा येथे गेले होते. तेथून दुचाकीने परतत असतानाच पिंपरखेडा बारीत रात्री सव्वा वाजेच्या सुमारास त्यांना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी अण्णा, थांबा… असा आवाज दिला.

त्यानंतर ते दोघांशी बोलायला बाजूला गेले. त्याचवेळी दोघांपैकी एकाने त्याच्याकडील गावठी पिस्तुलने अचानक यशवंत बागुल यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांच्या पाठीला मोठी जखम झाली. लगेच दुसर्‍याने त्याच्याकडील चाकूने यशवंत बागुल यांच्या मानेवर, छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे यशवंत बागुल जागेवरच कोसळले. हत्येचे दृश्य पाहून त्यांचा मामेभाऊ घाबरून घटनास्थळावरुन दुचाकीने निसटला.

हीबाब त्याने यशवंत बागुल यांची पत्नी आशाबाई यांना सांगितले. त्यानंतर नातेवाईक पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा यशवंत बागुल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. शेजारीच त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या आणि मॅग्झिन मिळून आले. तसेच पोलिस दलाच्या फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट पथकाने नमुने गोळा केले. श्वान पथकाने मारेकर्‍यांचा माग काढला.

याप्रकरणी आशाबाई यशंवत बागुल (वय 34) यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात इसमांवर गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एका संशयितांना ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामराव सोमवंशी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सपोनि विलास ताटीकोंडलवार, पोसई अनिल महाजन, पोना. प्रमोद ईशी, पोकॉ. राकेश मोरे, प्रमोद पाटील, नितीन दिवटे, अमोल कापसे, ज्ञानेश्वर गिरासे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या