धुळे – Dhule
साक्री तालुक्यातील फोफरे शिवारातील धरणात मासेमारीसाठी गेलेल्या तरूणाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल घडली. याबाबत निमामपूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
पिंटू बापू सोनवणे (वय 25 रा. फोफरे) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो दि. 9 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावाजवळील धरणावर मासेमारीसाठी गेला होते. मासेमारी करीत असतांना अचानक तोल जावून धरणाच्या पाण्यात पडला. त्यात पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
त्यादरम्यान बाहेर उभा छोटू मालचे याने तत्काळ गावात कळविले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने तरूणाचा पाण्यात शोध घेण्यात आला. परंतू तो आढळून आला नाही. तसेच महसूलचे व पोलिस कर्मचारी दाखल झाले. त्यांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला. दि. 11 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तरूणाचा मृतदेह पाण्यातवर तरंगतांना दिसून आला.
त्याला जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत निजामपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.