भुसावळ Bhusawal
अभ्यासाच्या तणावामुळे (study stress) मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, अशी इंग्रजीतून सुसाईड नोट लिहत भुसावळ शहरातील तरुणाने (youth) गळफास घेत (commits suicide) आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आयुष निलेश राठाेड (21, गंगाराम प्लाॅट) असे मयत तरुणाचे नाव आहे. ॲड.पुखराज राठाेड यांचा तो नातू व ॲड. निलेश राठाेड यांचा मुलगा होय.
मंगळवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. पुणे येथे सीएस (कंपनी सेक्रेटरी) शिक्षण घेत असलेला आयुष निलेश राठाेड हा येथे आला हाेता, ताे येथे बीकाॅमच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत हाेता. मंगळवारी सकाळी राठाेड हा दहा वाजले तरी उठला नाही म्हणून त्याच्या आईने त्याला आवाज दिला.
मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याच्या भावाने खिडकीचा काच फाेडून आतील पडदा दूर केला असता, आयुष राठाेड याने छताला दाेरी बांधून गळफास घेतला हाेता.
बाजारपेठ पाेलिस ठाण्यात राकेश राठाेड यांनी दिलेल्या माहितीवरून कस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली . पाेलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश चाैधरी पुढील तपास करीत आहे. आयुष यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.