Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रमाझे बलिदान वाया जाऊ देऊ नका...; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाची विष प्राशन...

माझे बलिदान वाया जाऊ देऊ नका…; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाची विष प्राशन करत आत्महत्या

नांदेड | Nanded

हदगाव (Nanded Hadgaon Taluka) तालुक्यातील वडगाव येथील एका चोवीस वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची (Youth Atempted Suicide) घटना घडली. ‘एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलीदान देत आहे. माझे हे बलीदान वाया जावु नये असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी त्याच्या जवळ आढळून आली आहे. शुभम सदाशिव पवार असे मयत तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. तसेच यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय शुभम पवार हा प्लंबर म्हणून काम करत होता. शनिवारी तो रेल्वेने मुंबईहून नांदेड येथे आला होता. वडिलांना फोन करुन शुभमने आपण बहिणीकडे जाऊन फ्रेश होऊन गावी येतो असे सांगितले.

अमृत कलशांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गावाचे प्रतिबिंब अमृतवाटिकेत दिसेल : पालकमंत्री भुसे

परंतु ‘शुभम’ हा रात्री सात वाजेपर्यत घरी आला नाही, फोन लावले असता फोन उचलत नाही. त्यानंतर नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. शुभम हा सकाळ पासुन घरी आलाच नाही. असे तामसा पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांनी शुभम यांचे मोबाईलचे लोकेशन चेक केले असता अर्धापुर परीसरात मोबाईल लोकेशन आहे असे सांगितले. पोलिसांनी शुभमचे मोबाईल लोकेशन जाऊन तपासले असता नरहरी मंगल कार्यालयाच्या शेजारी त्याचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, त्याच्या जवळ विषारी औषधाचा डब्बा, पावती व चिठ्ठी आढळली. ज्या चिठ्ठीमध्ये ‘एक मराठा लाख मराठा’ , मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलीदान देत आहे, माझे हे बलीदान वाया जावु नये मी शुभम सदाशिव पवार असा मजकुर आढळून आला.

IND Vs NZ : भारत-न्यूझीलंड आज आमनेसामने; कोण मारणार बाजी?

मराठा समाजाची मागणी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्हयातील २४ वर्षीय शुभम पवार या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिट्ठी लिहली असून त्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. दरम्यान मयताच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० लाखांची मदत , मयत युवकाच्या बहिणीला शासकीय नोकरी, कुटुंबाला घरकुल या मागण्या मान्य होऊ पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आली. युवकाचा मृतदेह नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आहे.

मनोज जरांगे पुढची भुमिका स्पष्ट करणार

मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे आदी मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी शासनाला दिलेली मुदत मंगळवारी (ता. २४) संपत आहे. मुदत संपत आली तरी शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यात ते काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जरांगे आपली भूमिका मांडणार आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या