Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारकृषि पदविकाधारक तरुणाने घेतले कोथिंबीरचे भरघोस उत्पादन

कृषि पदविकाधारक तरुणाने घेतले कोथिंबीरचे भरघोस उत्पादन

चिनोदा Chinoda ता.तळोदा । वार्ताहर

कृषि पदविकेचे शिक्षण घेऊन ही अनेक तरुण (youth) वडिलोपार्जित शेतीकडे वळत नाहीत मात्र चिनोदा येथील एका तरुणाने कृषि पदविकेचे (Agriculture Diploma Education) शिक्षण घेऊन आपल्या शेतात (field) नवनवीन प्रयोग (New experiments) यशस्वी करत आहेत.

- Advertisement -

तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील तरुण जयराज भाऊराव मराठे याने रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयातून दोन वर्षाचा कृषि पदविका अभ्यासक्रम सन 2011 यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यानंतर विविध कृषिच्या कंपनीत नोकरी केली. ती ही नोकरी सोडून स्वतःचे कृषिसेवा केंद्र सुरू केले मात्र त्यातही अपयश आले. घराची जबाबदारी त्याच्यावर आल्याने कृषि शिक्षणाचा उपयोग त्याने अत्याधुनिक शेतीत करण्याचा ध्यास घेतला. नोकरीच्या मागे न लागता व वेळ व्यर्थ न घालवता त्याने आपल्या वडिलांच्या शेतीची धुरा हाती घेऊन शेतात मेहनत करण्यास सुरुवात केली.

चिनोदा येथील जयराज मराठे याने शेतात नवनवीन प्रयोग करत ऊस पिकात कोथिंबीर हे आंतर पीक घेतले. यात त्याला कोथिंबीरचे चांगले उत्पन्न मिळाले असून तरुण वयातच शेतीची कास धरून नवनवे प्रयोग करणार्‍या या युवकांचे कौतुक करण्यात येत आहे. शिक्षण घेऊन नोकरी न लागल्यामुळे अनेक तरुण हताश होतात मात्र कृषिचे शिक्षण घेतलेल्या जयराज मराठे या तरुणाने नवा आदर्श उभा केला असून आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करीत कोथिंबीर लागवड करीत लाखोंचे उत्पन्न घेत आहे.

चिनोदा गावातील युवा शेतकरी जयराज, किशोर मराठे, योगेश पटेल, महेंद्र पाटील या शेतकर्‍यांनी एकत्रीत येऊन आठ एकर क्षेत्रावर धने लागवड करून कमी पाण्यात, कमी खर्चात भरघोस ऊत्पन्न घेतले. अवघ्या 40 दिवसात कोथिंबिर काढणीस सुरुवात झाली होती. त्यावेळी तळोदा, शहादा, नंदुरबार मार्केटमध्ये 20 ते 25 रुपये प्रती किलो दर मिळाला होता. अतिशय नियोजनबद्धरित्या व अभ्यासपूर्ण अशी कोथिंबीरची शेती पिकवून त्याने साधलेली प्रगती ही आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरली आहे. वर्षभरातील काही महिने घेतलेल्या परिश्रमातून जयराज मराठे कोथिंबीरची शेती फुलविली. यासाठी त्याला त्याचे थोरले बंधू किशोर मराठे याचे मार्गदर्शन लाभत असून अतिशय नियोजनबद्धरित्या केलेल्या त्याच्या या प्रयोगशील शेतीचे चिनोदा परिसरातून कौतुक केले जात आहे.

मी कृषि विद्यालय रांझणी येथून दोन वर्षाचे कृषि पदविकेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले मात्र अपयश आले. त्यामुळे वडिलांची असलेली शेती करण्याचा निर्णय घेतला. या शेतीमध्ये मी पारंपरिक शेती न करता प्रयोगशील शेती करण्यात सुरूवात करून ऊसामध्ये आंतर पिक म्हणून कोथिंबीरचे उत्पादन घेतले. यात मला बर्‍यापैकी उत्पन्न मिळाले.

– जयराज भाऊराव मराठे कोथिंबीर उत्पादक शेतकरी,चिनोदा

मी कृषि विद्यालय रांझणी येथून दोन वर्षाचे कृषि पदविकेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले मात्र अपयश आले. त्यामुळे वडिलांची असलेली शेती करण्याचा निर्णय घेतला. या शेतीमध्ये मी पारंपरिक शेती न करता प्रयोगशील शेती करण्यात सुरूवात करून ऊसामध्ये आंतर पिक म्हणून कोथिंबीरचे उत्पादन घेतले. यात मला बर्‍यापैकी उत्पन्न मिळाले.

– किशोर मराठे शेतकरी,चिनोद

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या