मुंबई | Mumbai
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) एक गट भाजपसोबत गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट झाल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री बदलण्यात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याबाबत आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी मोठे विधान केले आहे….
आदित्य ठाकरे यांनी आज बीडीडी प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ‘आता असे झाले आहे की खरा मुख्यमंत्री कोण याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात खरा मुख्यमंत्री (Chief Minister) कोण हे कळेल’ असे त्यांनी म्हटले.
Uddhav Thackeray : “इंडिया आघाडीचे नेतृत्व पक्षप्रमुखांनी नव्हे तर…”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले मत
पुढे आदित्य ठाकरेंना माध्यम प्रतिनिधींनी तुम्हालाही भाजपची (BJP) ऑफर आहे, मात्र अजितदादा आणि एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही जात नाहीत, असा प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देतांना ते म्हणाले की, मी कधीही ऑफरच्या राजकारणाला महत्त्व देत नाही. मुंबईत येणाऱ्या काळात इंडियाची बैठक होणार आहे. जे देशासाठी लढत आहेत, ते एकत्र आले आहेत. हुकूमशाही सरकारला हाकलून लावायचे आहे, असे त्यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ‘सामनात जे आले, ती पक्षाची भूमिका आहे. संजय राऊत यांनी जे मांडले, तीच आमची भूमिका आहे’. सध्याच्या राजकारणात लढा प्रामाणिक, एकनिष्ठ आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी लोक तसेच स्वार्थी लोक आहेत. आता लोकांनाच काय ते ठरवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
Landslide : शिवभक्तांवर काळाचा घाला; मंदिरावर दरड कोसळून ९ भाविकांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आजारपणाचे कारण देत त्यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार; शिमल्यात भूस्खलन, ३० ते ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले