Sunday, May 26, 2024
HomeनाशिकNashik : गद्दारांच्या राजकारणावर बुलडोझर फिरवण्यासाठी सज्ज व्हा - आदित्य ठाकरे

Nashik : गद्दारांच्या राजकारणावर बुलडोझर फिरवण्यासाठी सज्ज व्हा – आदित्य ठाकरे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आदर्श सांगणार्‍या गद्दारांनी वांद्रातील शाखेवरील बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवला व कार्यालयावर बुलडोझर फिरवला. राज्यभरात त्या गद्दारांच्या राजकारणावर बुलडोझर फिरवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज होण्याचे आवाहन ठाकरे गटाचे आमदार तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले. सातपूर येथील डेमोक्रसी सभागृहात शिवसेनेचा (ठाकरे गट) मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते…

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्य कृषी व उद्योग क्षेत्रात आघाडीवर असताना दोन्ही क्षेत्रात राज्याची पीछेहाट होण्यास बेभरवश्याचे मुख्यमंत्री कारणीभूत आहेत. या सरकारची फक्त तोडफोड करुन सत्ता टिकवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न वार्‍यावर सोडलेले आहे. राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत. वेदांता सारखा उद्योग गुजरातमध्ये गेला आणि मागच्याच महिन्यात गुजरातमध्येही (Gujrat) उद्योग उभारण्यास नकार देते उद्योग राज्याबाहेर नव्हे तर भारताबाहेर गेला. त्यामुळे या राजकारणात राज्याचेच नव्हेतर देशाचे नुकसान झाले, असे ठाकरेंनी म्हटले.

Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार केवळ सत्तेचे राजकारण करत असून महाराष्ट्र व मुंबईचा द्वेष करत आहे. अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी त्यांचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. केंद्र सरकारची भूमिका हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करणारी असून मुख्यमंत्री दर दोन दिवसांनी केंद्राच्या भेटीला जात असल्याने कोणाच्या भरोशावर सरकार चालवत आहे? हा प्रश्न पडतो. विधानसभेत (Vidhansabha) गेल्यानंतर या खोकेबाजांची चेहरे पाहण्यासारखे होतात. ज्यांनी पक्षातून गद्दारी करण्याचे कारण सांगितले त्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. आम्हाला निधी देत नसलेल्या अजित दादांचा विरोध म्हणून गद्दारी केल्याचे बोलले जात होते. मात्र आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसताना त्यांना लाज वाटत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर; १०० हून अधिक लोकांची ओळख पटली

तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) आशेवर अनेकांनी बाशिंग बांधलेले होते. त्या सर्व आमदारांना (MLA) भुई थोपटण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मंत्र्यासह या आमदारांना आता अपात्र ठरल्यानंतर आमदारकी सोडण्याची वेळ येणार आहे. त्या सर्वांना त्यांच्याच वार्डात गाडून त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज होण्याचे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच आसाम आणि मणिपूरमध्ये सुरू असलेला गंभीर तमाशा केंद्र सरकारला दिसत नाही का? असा सवाल विचारत आसामचे राज्य सरकार त्यावर काही बोलत नाही. उलट जनतेसमोर सत्य घटना आल्याने तो व्हिडिओ दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश या गुंडगिरीला प्रोत्साहन देणारे असल्याचे ठाकरेंनी म्हटले.

“मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…”; आमदार अमोल मिटकरींचे सूचक ट्वीट

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार वैभव नाईक, शुभांगी पाटील, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार वसंत गिते, अनिल कदम, योगेश घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, गटनेते विलास शिंदे यांच्यासह ठाकरे गटाचे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या