Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्याAaditya Thackeray : "भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे..."; आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

Aaditya Thackeray : “भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे…”; आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

मुंबई | Mumbai

- Advertisement -

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Rainy Season) काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बारसू आंदोलनाबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी फडणवीसांनी बारसू येथील आंदोलनासाठी (Barsu Movement) बंगळुरूतून फंडिंग झाले आहे, असा गंभीर आरोप आंदोलकांवर केला होता. त्यानंतर आता यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्वीट करून कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कशासाठी? असा प्रश्न विचारत भाजपावर (BJP) टीका केली आहे.

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद

आदित्य ठाकरेंनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, “नाणार असो की बारसू असो… भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे, हे वारंवार दिसतंच. त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं! पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी? पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग” अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्र द्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहताएत? असा सवाल ठाकरेंनी विचारला आहे.

तसेच पुढे आदित्य ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटले की, “उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील… स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील! कारण एकच-ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग!,” असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Crime News : लग्नास नकार दिल्याने प्रेयसीवर चाकूने सपासप वार

- Advertisment -

ताज्या बातम्या