Friday, June 20, 2025
Homeदेश विदेशAam Admi Party: दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा झटका; वरिष्ठ नेत्यांकडून वेगळ्या...

Aam Admi Party: दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा झटका; वरिष्ठ नेत्यांकडून वेगळ्या गटाची घोषणा, १३ नगरसेवकांचा पक्षाला रामराम

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीतील सत्ता गमावणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात फूट मोठी पडली आहे. दिल्ली महापालिकेत पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत वेगळा गट स्थापन केल्याची घोषणा केली आहे. दिल्ली नगर निगम म्हणजे महापालिकेमध्ये १३ नगरसेवकांनी आप पक्षाला रामराम करत वेगळा गट तयार केला आहे. हेमचंद गोयल यांच्या नेतृत्वाकाली १३ जणांनी आप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत इद्रप्रस्थ विकास पार्टी नावाने वेगळा गट तयार केला आहे. मुकेश गोयल हे या पक्षाचे नवे नेते असतील.

दिल्ली महापालिकेत गेल्याच महिन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला होता. भाजपचे नगरसेवक राजा इक्बाल सिंह नवे महापौर बनले. त्यांना १३३ मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार मनदीप यांना केवळ ८ मतांवर समाधान मानावे लागले. आपने महापौर पदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. आपने निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर आपमधील नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती. ही नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती.

- Advertisement -

आप पक्षाच्या १३ वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे
हेमनचंद गोयल
दिनेश भारद्वाज
हिमानी जैन
उषा शर्मा
साहिब कुमार
राखी कुमार
अशोक पांडेय
राजेश कुमार
अनिल राणा
आम आदमी पार्टी ने
देवेंद्र कुमार
हिमानी जैन

मुकेश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन गटात १५ नगरसेवक आहेत, जे आता इंद्रप्रस्थ विकास पक्षाचा भाग होतील. आम आदमी पक्षासाठी हे एक मोठे राजकीय आव्हान मानले जात आहे. मुकेश गोयल आणि हेमचंद्र गोयल यांच्यासह अनेक नेते यापूर्वी काँग्रेस पक्षात होते. गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी हे लोक काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात सामील झाले होते. विधानसभा निवडणुकीत आदर्श नगर मतदारसंघातून आम आदमी पक्षाने मुकेश गोयल यांना उमेदवारी दिली होती.

दरम्यान, दिल्ली महापालिकेत नव्या पक्षाची स्थापना झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीतील आपच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी स्थापन झालेल्या नव्या गटामुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होवू शकता. याबद्दल आप पक्षाने अद्याप तरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे पक्षाचे नेतृत्व त्रस्त असून पेच सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पक्षांतर्गत सुत्रांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...