Saturday, March 15, 2025
Homeनाशिकआम्ही सारे नागवंशीयकडून निषेध मोर्चा

आम्ही सारे नागवंशीयकडून निषेध मोर्चा

नाशिक । Nashik

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सारे नागवंशीय बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथे राहणार्‍या दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. देशभरातून या घटनेसंदर्भात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर काल पंचवटीतील फुलेनगर परिसरात कँडल मार्चच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली तर आज गोल्फक्लब जवळ करण्यात आलेल्या निदर्शन आंदोलना दरम्यान देशातील बलात्कारांच्या सर्वच केसेस फास्टट्रैक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शासन व्हावे,

फाशीची शिक्षा देण्यात यावी, हाथरस मधील पिडित तरूणीच्या कुटुंबियांना सुयोग्य संरक्षण द्यावे, हाथरस प्रकरणातील पिडितेच्या जबानीला अनुसरूनच कारवाई करण्यात यावी अशाप्रकारच्या १० मागण्या आम्ही सारे नागवंशीय बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने निषेध आंदोलन तथा लिखित निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

यावेळी शाहिरी जलशाच्या माध्यमातून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी निदर्शने करण्यात आली. या आदरांजली सभा तथा निदर्शनाला म.फुलेनगर मित्र मंडळ, आंबेडकर राईट स्कॉड, संभाजी ब्रिगेड, सम्राट सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र युवासेना अशा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून सदर निदर्शनास पाठिंबा दर्शविला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : पाचशे किलो मांस जप्त; खोडेनगरातून सहा जण अटकेत

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गोवंशीय जनावरांचे मांस (Beef) नाशकात (Nashik) विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितांना शहर गुन्हेशाखा युनिट एकने गजाआड केले आहे. पथकाने सापळा रचून...