Saturday, April 26, 2025
HomeमनोरंजनVideo घटस्फोटाच्या २४ तासानंतर आमिर खान, किरणचा फेसबुक संवाद

Video घटस्फोटाच्या २४ तासानंतर आमिर खान, किरणचा फेसबुक संवाद

मुंबई :

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) यांनी सोशल मीडिया (Scocial Media) पोस्टद्वारे घटस्फोट (divorce) घेत असल्याची माहिती दिली. जवळपास १५ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर त्यांनी शनिवारी हा निर्णय जाहीर केला. आमिर खान (Amir Khan) यांच्या घोषणेला २४ तासही उलटत नाहीत, तोच आमीर आणि किरण यांचं एकत्र फेसबुक लाईव्ह (facebook live) पाहायला मिळाले. पानी फाऊण्डेशनतर्फे आयोजित ‘सोयाबीनची डिजिटल शेती शाळा’ या उपक्रमात आमीर आणि किरण एकत्र सहभागी झाले.

- Advertisement -

कालच आमिर व किरण यांनी संयुक्त वक्तव्य जारी केले होते. त्यात त्यांनी पानी फाऊंडेशनच्या कामात आम्ही एकत्र राहू, असे म्हटले होते.

शनिवारी काय म्हणाले होते आमिर व किरणखान

“१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचे नाते, विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिले. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू. मुलाचा सांभाळ करण्यासोबत आम्ही फिल्म, पाणी फॉउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर अनेक प्रोजेक्टवर पुढेही एकत्र काम करू. आम्हाला समजून घेत आमच्या या निर्णयात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या कुटुंबियांचे आणि मित्र परिवाराचे आभार.” असे आमिर आणि किरण या स्टेटमेंटमध्ये म्हणाले आहेत.

लगानमुळे जुळले होते सूर

‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता. आमिर खानला पहिली पत्नी रिया दत्तापासून दोन मुलं आहेत, आयरा खान आणि जुनैद खान.

मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...