Saturday, April 5, 2025
Homeमनोरंजनअभिनेता आमिर खानला करोनाची लागण

अभिनेता आमिर खानला करोनाची लागण

मुंबई | Mumbai

देशासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अनेक नेते मंडळी तसेच बॉलीवूड सेलिब्रेटी करोनाच्या विळख्यात सापडले आहे.

- Advertisement -

त्यातच, बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला करोनाची लागण झाली आहे. सध्या आमिर खानने स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे.

या वृत्ताला आमिर खानच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. आमिर खान करोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट झाले असून, तो सध्या क्वारंटाईमध्ये असल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे.

दरम्यान, जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झाला होता. हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता. यावेळी आमिर खान आणि उद्धव ठाकरे शेजारीच बसलेले होते.

त्याचबरोबर या कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमिर खानची पत्नी किरण राव आदी उपस्थित होते. तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना देखील करोनाची लागण झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बनावट सोने तारण ठेऊन बँकेची केली फसवणूक

0
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed येथील कॅनरा बँकेच्या (Canara Bank) शाखेत तीन खातेदारांनी बनावट सोने तारण (Counterfeit Gold Mortgage) ठेवून तब्बल 17 लाख 73 हजार रुपयांचे कर्ज...