मुंबई । प्रतिनिधी Mumbai
नियमित आणि तांत्रिक देखभालीसाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलची सेवा उद्या ,गुरुवार १० एप्रिल २०२५ पासून १४ एप्रिल २०२५ अशी सलग पाच दिवस बंद राहणार आहे. या कालावधीत पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
- Advertisement -
या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार’ केंद्र चालक, ‘सेतू’ केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.