Tuesday, April 1, 2025
Homeधुळेदोन अल्पवयीन मुलीचे अपहरण

दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण

धुळे dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील शिरधाणेसह एैचाळे (ता. साक्री) येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. शिरधाणे प्र. नेर येथे राहणार्‍या 15 वर्षीय मुलीला गावातील मारोती फाटानजीक राहणारा खेमराज दौलत पाटील (वय 23) याने फुस लावून पळवून नेले. दि. 27 मे रोजी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयीतावर धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोना अमोल बोरसे तपास करीत आहेत.दुसर्‍या घटनेत एैचाळे (ता. साक्री) गावातून 16 वर्षीय मुलीला दि. 26 ते 27 मे दरम्यान गावातील शंकर ठाकरे याने काहीतरी फुस लावून पळवून नेले. यासाठी त्याला भुर्‍या सुका भवरे व पावती भुर्‍या भवरे यांनी मदत केली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार वरील तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोना वाडीले करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रेडीरेकनेर दरात वाढघरे-मालमत्ता महागली

0
मुंबई | Mumbai आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणार्‍यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95%...