Wednesday, May 21, 2025
Homeनगरअपहरण करून खंडणी मागणारी शिरूरची टोळी जेरबंद

अपहरण करून खंडणी मागणारी शिरूरची टोळी जेरबंद

शिरूर |प्रतिनिधी| Shirur

- Advertisement -

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैध गावटी पिस्टल, हत्यारे बाळगून खून, खुनाचा प्रयत्न तसेच उपहरण करून मारहाण करून खंडणी गोळा करणार्‍या टोळीला पुणे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

अंकुर महादेव पावळे (26) ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली श्रीकांत पावळे(25, दोघे रा. कावळ पिंपरी ता. शिरूर), विशाल ऊर्फ आण्णा शिवाजी माकर (23, रा. ढोकसांगवी ता शिरूर), दिलीप रामा आटोळे (45, रा. जांबुत दुडेवस्ती ता. शिरूर), निलेश बबन पळसकर (35, रा. जांबुत ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या प्रकरणी लियाकत नुरइस्लाम मंडल ( रा. निरगुडसर ता आंबेगाव जि पुणे) यांनी तक्रार दाखल केली होती. ते बांधकाम व्यवसायीक असून त्यांचे शिरूर तुलक्यातील पिंपरखेड, जांबूत या परीसरात घरांची बांधकामे सुरू आहेत. 2 आक्टोबर रोजी काठापूर गावचे हद्दीत त्याचे या टोळक्याने अपहरण करून मोबाइल, पाकीट, पाच हजार रूपये अस काढून घेतले. त्यांना मारहाण करत बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर आमचे कडून वाळू घ्यायची आणि दहा लाख रूपये खंडणी द्यायची अशी धमकी दिली.

मंडल याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना लाकडी काठी, दांडक्याने मारहाण करून त्याचा हात फ्रेंक्चर केला. तसेच पिस्टल मंडल याचे डोक्याला लावून, तुला आता खल्लास करतो, असे म्हणत पिस्टलचा ट्रिगर दाबत असताना लियाकत मंडल याने एक लाख रुपये देतो असे सांगितलेने त्यास जिवंत सोडून दिले. नंतर त्यांच्या मुलाने एक लाख रूपये टोळीला नेऊन दिले. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनला अपहरण, खंडणी, हत्यार बाळगणे असे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

परंतु यानंतर हे गुन्हेगार फारार झाले होते. अधिक्षकांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अविनाश शिळीमकर यांनी विशेष तपास पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला होता. दरम्याने या गुन्हयातील मुख्य तीन आरोपी हे कोरेगाव भिमा या परीसरात येणार असून ते मध्यप्रदेश राज्यात पळून जाण्याचे तयारीत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 5 गावठी पिस्टल व 9 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत.

चौघे रेकॉर्डवरील गुन्हेगार

या प्रकरणात अटक करण्यात आलेले अंकुश पाबळे, विशाल माकर, माऊली पाबळे व दिलीप आटोळे हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर शिरूर, नारायणगाव, पारनेर, सुपा पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आयपीएलच्या बाद फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्याचे अधिकृत वेळापत्रक (Schedule) भारतीय क्रिकेट नियामक (Indian Cricket Association) मंडळाने जाहीर केले आहे....