Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे आणि…; अब्दुल सत्तारांचे सभेत...

पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे आणि…; अब्दुल सत्तारांचे सभेत मतदारांना आवाहन

जालना | Jalna
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी लाडकी बहीण आणि इतर काही योजनांचा वारंवार उल्लेख करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर राज्यातील मंत्री खासदार प्रचारासाठी नगरपालिका क्षेत्रात जाऊन मतदारांना आवाहन करत आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचार थांबल्यानंतर लक्ष्मीदर्शन होणार असल्याचे म्हटले. तर, दुसरीकडे आमच्या उमेदवाराला निवडून द्या, निधी देऊ असे आश्वासन सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश तालुक्यात पैशांचा विषय निघत आहे. आता, राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनीही निवडणुकीतील पैशांवरुन भाष्य केले आहे.

शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार हे त्यांच्या बेताल वक्तव्याने चर्चेत असतात. आता ही त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा ते चर्चेत आले आहे. नगरपरीषद निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने ते जालन्यातील अंबड तालुक्यात होते. तेथे शिवसेना महायुतीच्या नगरध्यक्षपदाच्या उमेदवार सना मुस्तकीन पटेल यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, समोरचे जे पैसे देत आहेत ते काही त्यांच्या बापाच्या तिजोरीतून देत नाहीत,आपल्या तिजोरीतून खाल्लेले आहेत. त्यांनी पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे आणि धनुष्यबाणाचे बटन दाबायचे असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या काळात तुम्हाला मटण देतील, ते खा. पण बटण आमचेच दाबा, नगरविकास आमच्याकडे आहे, नगरविकास विभागाकडे खूप माल आहे, त्यामुळे उठ भक्ता 1 तारखेला लक्ष्मी येणार, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक येथील सभेत केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारवासारव केली. नगरपालिका क्षेत्राचा विकास नगरविकास खाते करते, त्यामुळे नगरविकास खाते महत्त्वाचं आहे, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Sangamner : अवैध कत्तलखान्यावर ‘एलसीबी’चा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरातील अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) शुक्रवारी (दि.23) महिन्याभरात चौथी मोठी कारवाई केली आहे. गोवंश जनावारांचे कत्तल...