Saturday, July 27, 2024
Homeनाशिकलालपरीच्या कोकणवारीने इगतपुरीसह ग्रामीण भागातील प्रवाशांची दैना

लालपरीच्या कोकणवारीने इगतपुरीसह ग्रामीण भागातील प्रवाशांची दैना

इगतपुरी । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इगतपुरी आगारातील सुमारे १५ बस गणेशोत्सवासाठी कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. या १५ बसच्या कमतरतेमुळे इगतपुरी तालुक्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

अनंत चतुर्दशीपर्यंत या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणावर भाविक विविध ठिकाणांहून जात असतात. त्यामुळे या भाविकांच्या दळणवळणाची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था केली जाते. यंदाही तशी व्यवस्था झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या इगतपुरी आगारातील बससेवेवरही त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तर आगार व्यवस्थापकांना फोन केला तर ते फोन ही उचलत नसल्याने प्रवाशांची कुचंबना होत आहे. नाशिकहून रात्री आठ नंतर जुन्या सी.बी एस वरून लवकर बस उपलब्ध न झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना रोजच दोन ते अडीच तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे महिला वर्ग, वृद्ध लहान बालके नाशिक येथे गणपती दर्शनाला जातात मात्र येताना बस खूप उशिरा येत असल्याने त्यांची मोठी कुचंबना होत आहे.

सी.बी. एस वरील मदत कक्षात विचारणा करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना अर्धा तासात बस येईल असे अंदाजे सांगत असल्याने प्रवाशांना ताटकळत ठेवले जाते. मात्र स्पष्ट उत्तर प्रवाशांना भेटत नाही त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या