Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAmit Thackeray: 'हे' फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे! माहिममधल्या घटनेनंतर अमित...

Amit Thackeray: ‘हे’ फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे! माहिममधल्या घटनेनंतर अमित ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई | Mumbai
मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अँटॉप हिल पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रकणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मनसे नेते अमित ठाकरेंनी पोस्ट लिहिली आहे ज्यामुळे अमित ठाकरे चर्चेत आले आहे.

अमित ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे.
मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचे प्रमाण वाढते आहे, अनेक घरे उद्ध्वस्त होत आहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.

- Advertisement -

कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात पाच टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येते कुठून? ते पोहोचते कुठे? आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरे मिळवणे आणि ड्रग्सचे नेटवर्क मोडून काढणे आता अत्यावश्यक झाले आहे.

मनसेने सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. म्हणूनच माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचे वचन दिले होते आणि आज त्या दिशेने पाऊले टाकत आहे. सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे.

जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभे राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसे उत्तर देण्याची!
आपला,
अमित ठाकरे

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...