Thursday, April 3, 2025
Homeधुळेलग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

धुळे । dhule । प्रतिनिधी

लग्नाचे आमिष (lure of marriage) दाखवत एकाने महिलेवर बलात्कार (rape of woman) केला. तसेच तिची अडीच लाखा रुपयात फसवणूकही (Fraud) केली. ही घटना धुळे तालुक्यातील नेर गावात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत नेर येथील 31 वर्षीय पीडित महिलेने धुळे तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तुषार विठ्ठल बडेर (वय 33 रा. नेर) याने पिडीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर गाव शिवारातील एकाच्या शेतातील शेडमध्ये बलात्कार केला. तसेच तिची दिशाभुल करीत तिच्या कडील अडीच लाख रूपये घेवून तिची फसवणूक केली.

त्यांनतर पिडीतेने पैसे परत मागितले असतात तिला तुषार याने शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार सुमारे आठ महिन्यापुर्वी घडला. याप्रकरणी संशयीत आरोपीवर भांदवि कलम 376, 420, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि ताटीकोंडलवार पुढील तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आज KKR समोर SRH चे आव्हान; कुणाचे पारडे...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (गुरुवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders and...