Sunday, May 26, 2024
Homeजळगावमुकबधीर महिलेवर अत्याचार ; शेजारच्यावर गुन्हा

मुकबधीर महिलेवर अत्याचार ; शेजारच्यावर गुन्हा

धुळे । प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या शेजारच्या व्यक्तिनेच मुकबधीर महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी साक्री पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात राहणारी 30 वर्षीय कर्णबधीर व मुकबधीर महिला दि.24 फेबु्रवारी रोजी घरी एकटीच होती. तेव्हा तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने तिच्या घरात घुसून दरवाजाची कडी आतून लावून घेतला.

- Advertisement -

सात वर्षांपूर्वी जिथे आईचा प्राण गेला तिथेच मुलगा झाला ठार!

त्यानंतर तिच्यावर जबरीने बलात्कार केला. याबाबत सुरत येथे राहणार्‍या पिडीत महिलेच्या आईने साक्री पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वंजी पाटील याच्यावर भादंवि कलम 376 (2) (आय) सह अपंग व्यक्ती अधिनियम 2016 चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक निकम हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या