Monday, May 27, 2024
Homeनगरलाचलुचपतचे निरीक्षक करोना पॉझिटिव्ह

लाचलुचपतचे निरीक्षक करोना पॉझिटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही करोनाने शिरकाव केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघा कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

नगरमध्ये करोनाने धुमाकूळ घातला असून आता सरकारी कर्मचारी त्याच्या कचाट्यात सापडले आहेत. पोलीस निरीक्षकांना करोनाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर दोघा कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. दरम्यान, लाचलुचपतचे पोलीस निरीक्षक दहा दिवसांपासून सुट्टीवर होते. ते नगरमध्ये आल्यानंतरच त्यांना करोनाची लक्षणे दिसू लागली. निरीक्षक सुट्टीवर असल्याने कार्यालयातील इतरांशी त्यांचा जास्त संपर्क आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या