देवळा | प्रतिनिधी Deola
देवळा नाशिक रस्त्यावर भावडे फाट्यानजीक झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून ,दोन जण गंभीर जखमी झाले आहेत . जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला दाखल करण्यात आले आहे . देवळा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे .
याबाबत पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी कि , गुरुवारी दि ७ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास देवळ्याहून नाशिक च्या दिशेने जात असलेली कार ( एम -एच -४७ -डब्लू -६३३६ ) भावडे फाट्यावर झाडावर जाऊन आदळली. यात कारमधील शुभम संदीप शेलार ( ३० ) हा युवक जागीच ठार झाला तर अन्य दोन मंदार गजमल सावंत ( ३५) , वैभव सुभाष गंभीरे( ३० ) रा. कल्याण हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
अपघातग्रस्त या कार मधील तिन्ही जण तालुक्यातील माळवाडी येथे दि. ६ रोजी लग्नाच्या मांडवांसाठी आलेले होते. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना नंतर मयत शुभम संदीप शेलार याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे . या दुर्दैवी घटनने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .





