Saturday, April 26, 2025
HomeजळगावAccident सुसाट स्पीड स्पोर्ट बाईकने वृद्धाच्या चिरडले

Accident सुसाट स्पीड स्पोर्ट बाईकने वृद्धाच्या चिरडले

पारोळा – प्रतिनिधी
नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सुसाट स्पीड स्पोर्ट बाईकने सारवे येथील साठ वर्षीय वृद्धास चिरडल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.15 रोजी दुपारी चार वाजेचे सुमारास घडली.

याबाबत सारवे तालुका पारोळा येथील सुखदेव गोबा सुसारडे (ठेलारी) (वय ६०) हे सारवे गावानजीक पायी रस्ता ओलांडत असताना नागपूर कडून मुंबईकडे जाणारी स्पीड स्पोर्ट बाईक क्रमांक एम एच 31-एफ टी 0045 वरील चालक निलेश अशोक पाटील वय 30 राहणार अशोक नगर नागपूर याने भरधाव वेगात बाईक चालवून सदर पायी चालणाऱ्या सुखदेव सुसारडे यांना चिरडल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

तसेच निलेश पाटील हा देखील जखमी झालेला असून त्याचेवर डॉक्टर जिनेन्द्र पाटील, प्रेम वानखेडे, प्रसाद राजहंस, अजय गटायडे, आदींनी प्रथमोपचार केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात निलेश पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...