दहिवड | मनोज वैद्य Dahivad
मुंबई आग्रा महामार्गावरील Mumbai-Agra highway सांगवी फाट्यावर Sangvi Photo गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात दोन जण ठार झाले असून मृत व्यक्ती चिंचवे येथील असल्याचे कळते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले असून ते चिंचव्याहुन उमराण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या MH 15 DB 0973 ह्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली.
अपघतात सुरेश दामू भदाणे व सूरज अशोक पानपाटील चिंचवे असे दोघे ठार झाले असून मृतदेह मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच माहिती मिळताच सोमा कंपाणीचे मंजूरभाई घाशी,रवी आहिरे, प्रशांत आप्पा ठाकरे, बंटी बोरसे, निवृत्ती झरोळे यांनी मदत कार्य केले.
देवळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या नेतृत्वाखाली देवळा पोलीस करीत आहेत.