Monday, July 27, 2026
HomeनगरAccident News : मुलाखतीसाठी निघालेल्या भावांचा अपघातात मृत्यू

Accident News : मुलाखतीसाठी निघालेल्या भावांचा अपघातात मृत्यू

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील राजेवस्ती येथे सोमवारी (दि.22) सकाळी झालेल्या अपघातात दोघा भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कर्जत तालुक्यातील कोंभळी येथील सार्थक सतीश भापकर (वय 18) या युवकाला बारामती येथे कंपनीत मुलाखतीसाठी सोमवारी सकाळी बोलावले होते. त्यासाठी दुचाकीवरुन सार्थक व त्याचा मोठा भाऊ विवेक (वय 21) चालले असताना कर्जत-बारामती रस्त्यावर राशीन शिवारामध्ये राजेवस्ती परिसरात सकाळी सात वाजता ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर बिघाड झाल्यामुळे दोन ट्रॉलीसह थांबलेला होता.

- Advertisement -

ट्रॅक्टर व दोन ट्रॉली ओलांडून पुढे जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेने दुचाकीवरून विवेक व सार्थक दोघेही खाली पडले. एका जणांच्या डोक्याला हेल्मेटही होता, मात्र जोरदार धडक बसल्यामुळे मार लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला. एका जणांच्या पोटाला व एका जणांच्या डोक्याला मार लागला, हेल्मेटदेखील तुटले.

आवाजाने परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. परंतु काळाने घाव घातला आणि या दोन्ही तरुण सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी कोंभळी येथे या दोन भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी संजय भापकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ जुलै २०२६ – यश शिरावर घेताना,विवेक पायाशी हवा

0
जंतरमंतरच्या ऐतिहासिक मैदानावर नुकताच घडलेला घटनाक्रम भारताच्या तरुणाईच्या अफाट ताकदीची आणि संघटित ऊर्जेची साक्ष देणारा ठरला. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या ‘जेन झी’ पिढीचे प्रतिनिधित्व...