Wednesday, November 11, 2026
HomeनगरJamkhed : गणेशस्थापनेच्या दिवशी चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Jamkhed : गणेशस्थापनेच्या दिवशी चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

ट्रॅक्टरच्या चाकाखाली सव्वा वर्षाचा देवांश चिरडला

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जामखेड तालुक्यातील मतेवाडी (जवळा) येथे हृदयद्रावक घटना घडली. ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून देवांश सचिन मते या सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तो मते कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने मतेवाडी व जवळा परिसरात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवांशचे वडील सचिन सुग्रीव मते हे सोमवारी (दि. 14 सप्टेंबर) शेतातील मका कुट्टीचे काम आटोपून ट्रॅक्टर घेऊन घरी आले होते. त्यांनी ट्रॅक्टर अंगणात लावला.

- Advertisement -

त्यावेळी देवांश अंगणात खेळत होता. खेळता खेळता तो ट्रॅक्टरजवळ गेल्याचे घरातील कोणाच्याही लक्षात आले नाही. ट्रॅक्टरच्या हालचाली दरम्यान देवांश मागील चाकाखाली आला. चाकाखाली चिरडल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. गणेशस्थापनेच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने मते कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घटना समजताच ग्रामस्थ, नातेवाईक व नागरिकांनी मते कुटुंबीयांच्या घरी धाव घेतली. एकुलत्या एक चिमुकल्याच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

सतेज

उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत; सतेज पाटलांचे...

0
कोल्हापूर | Kolhapurगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना...