Friday, April 25, 2025
Homeनगरअपघातात सेवानिवृत्त जवान जागीच ठार

अपघातात सेवानिवृत्त जवान जागीच ठार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुळदास दातीर हे दुहेरी ट्रेलरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दि. 20 जानेवारी रोजी घडली. आश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुळदास दातीर (वय 50) व त्यांचा मुलगा उत्कर्ष दोघेजण काल सकाळच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवर नगरकडे जात होते. ते राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील इरिगेशन कॉलनी समोर असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका डम्परने धडक दिली. त्याचवेळी एका दुहेरी ट्रेलरची धडक बसली. या अपघातात गोकुळदास दातीर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले. मात्र यावेळी त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हा थोडक्यात बचावला असून तो किरकोळ जखमी झाला.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार ठोंबरे व रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. राहुरी खुर्द परिसरातील इरिगेशन कॉलनी समोर कायमच अपघात होत असल्या कारणाने त्याठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे, अशी मागणी राहुरी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...