Sunday, June 8, 2025
Homeनगरमतदानासाठी येत असताना राहुरीतील पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू

मतदानासाठी येत असताना राहुरीतील पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

राहुरी शहरातील कासार समाजातील कामानिमित्त सध्या पुणे येथे कार्यरत असलेले मनोज हरिभाऊ रासने व त्यांचा मुलगा सुजल मनोज रासने या पिता-पुत्राचा सुपा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी पुण्याहून मनोज रासने व मुलगा सुजल हे मतदानासाठी राहुरीकडे येत असताना मंगळवारी सायंकाळी 7 वाजता सुपा परिसरात त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन रासने हे जागीच ठार झाले.

तर मुलगा सुजलला स्थानिकांनी गंभीर अवस्थेत सुपा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुजलच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने व जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचीही प्राणज्योत मालवली. बुधवारी सायंकाळी शवविच्छेदनानंतर दोन्ही पिता-पुत्रांवर राहुरी येथील गणपती घाट स्मशानभुमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज रासने यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Girish Mahajan : “फडणवीस CM झाल्याने चांगलं झालं, मागील अडीच वर्षांचा...

0
मुंबई | Mumbai  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या (Local Body Elction) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपले स्वातंत्र्य...