Tuesday, April 28, 2026
HomeनगरAccident News : भीषण अपघातात होमगार्ड जवानासह आईचा जागीच मृत्यू

Accident News : भीषण अपघातात होमगार्ड जवानासह आईचा जागीच मृत्यू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी दर्शनासाठी निघालेल्या मायलेकावर काळाने झडप घातली. कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी फाटा येथे दुचाकी व हुंडई कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात उमेश जगन्नाथ औटी (वय 44) आणि त्यांच्या आई कौशल्या जगन्नाथ औटी (वय 66, रा. औटीवस्ती, पाथर्डी) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने पाथर्डी शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीनिमित्त उमेश औटी हे आपल्या आई कौशल्या औटी व मुलासह दुचाकीवरून पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी येथील हरिहरेश्वर मंदिरात दर्शनासाठी रविवारी दुपारी निघाले होते. कोरडगाव रोडवरील टाकळी फाटा येथे समोरून येणार्‍या हुंडई कारची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की उमेश औटी व कौशल्या औटी यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेले. मात्र अहिल्यानगर येथे त्यांना हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या दुर्घटनेत सोबत असलेली लहान मुलगी सुदैवाने बचावली असल्याची माहिती मिळाली आहे.

उमेश औटी हे पाथर्डी होमगार्ड दलात कार्यरत होते. कर्तव्यनिष्ठ व मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वत्र परिचित होते. होमगार्डच्या सेवेसोबतच ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच आई-मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची नोंद पाथर्डी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : नाशिक, संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूरातही भोंदूबाबाला अटक

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur पोटदुखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी श्रीरामपूर शहर...