Friday, April 25, 2025
Homeनगरकारची दुचाकीला धडक; पती-पत्नी जखमी

कारची दुचाकीला धडक; पती-पत्नी जखमी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर पाथर्डी रोडवर भिंगारनाला परिसरात अज्ञात कार चालकाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाल्याची घटना गुरुवारी(26 डिसेंबर) सायंकाळी घडली. याप्रकरणी जखमी नवनाथ राधू महाडिक (वय 43, रा. साईकॉलनी, सैनिक नगर, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुरुवारी सायंकाळी फिर्यादी हे पत्नीसह दुचाकीवरून अहिल्यानगर ते पाथर्डी रोड वरून जात असताना (एमएच 46 एन 9213) पांढर्‍या रंगाच्या कारवरील चालकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले. कार चालकाने धडक देऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक फौजदार आर. के. दहिफळे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...