मुंबई | Mumbai
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील (Akola-District) अकोला-मंगरूळपीर रोडवर (Akola-Mangrulpir Road) दगडपारवा गावाजवळ विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण गंभीर जखमी झाले असून, मृतांमध्ये ट्रकमधील चार जणांचा समावेश आहे. तर अपघातामधील जखमींना अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर लोकांनी (People) ट्रक सरळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले.
दरम्यान. या रस्त्यावर अपघातांचे (Accident) प्रमाण प्रचंड वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. तसेच हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. परंतु त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही.