Monday, June 15, 2026
Homeमुख्य बातम्याAccident News : मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटात तिहेरी अपघात; ६ ठार, २६...

Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटात तिहेरी अपघात; ६ ठार, २६ जखमी

धुळे | Dhule

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) धुळेजवळील (Dhule) लळींग घाट परिसरात (Laling Ghat Area) आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास अत्यंत भीषण तिहेरी अपघात घडून ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रेतीचा डंपर, ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स बस यांच्यात हा भीषण अपघात झाला.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटे लळींग घाटात रेतीने भरलेला डंपर आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची (Accident) माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग पथक आणि टोल कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना वाहनांतून बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असतानाच मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचे चालकावरील नियंत्रण सुटले आणि बसने थेट अपघातग्रस्त ट्रक व डंपरला जोरदार धडक दिली.

या धडकेत ट्रॅव्हल्स बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. बसच्या (Bus) केबिनमध्ये बसलेले काही प्रवासी तसेच मदतकार्य करत असलेला एक टोल कर्मचारी गंभीररीत्या चिरडला गेला. या भीषण दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. सहकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे घटनास्थळी उपस्थित टोल कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या अपघातातील २६ जखमींना स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक (Traffic) काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून धुळे पोलीस पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

आ.रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित

0
पंढरपूर शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित...