Friday, April 25, 2025
HomeनगरAccident News : नियंत्रण सुटल्याने दुचाकी गोदावरी नदीत; एक ठार

Accident News : नियंत्रण सुटल्याने दुचाकी गोदावरी नदीत; एक ठार

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

भरधाव येणार्‍या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी गोदावरी नदीत कोसळली. या अपघातात तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरूवारी पहाटे दोन वाजता घडला. जीत रामदास गर्जे (वय 25, रा. निवारा, कोपरगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. या अपघातात यश धुमाळ हा जखमी झाला असून त्याला नाशिक येथे उपचारार्थ दाखल केले आहे. जीत गर्जे व यश धुमाळ हे बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दुचाकीवरून कोपरगावच्या दिशेने येत होते. गोदावरी नदीवरील शहरातील लहान पुलावरून येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्यावरून नदीत कोसळली.

- Advertisement -

काही वेळाने स्थानिक नागरिक तेथे पोहोचले, त्यांनी पोलिसांना घटना कळवली. पोलीस कर्मचार्‍यांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. जीत गर्जे यास ग्रामीण रुग्णालयात नेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. डिकले यांनी मयत घोषित केले. जखमी यश धुमाळ यास प्रथम कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात व नंतर नाशिक येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तो गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...