पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
सायंकाळी वॉकसाठी गेलेल्या महिलेला दुचाकीची धडक (Woman Bike Hit) बसल्याने झालेल्या अपघातात (Accident) एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मीना मधुकर नलवडे (वय 57, रा. विजयनगर, पाथर्डी) असे मृत्यू (Death) झालेल्या महिलेचे नाव आहे. पाथर्डी शहरातील विजयनगर येथील काही महिला नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास वॉकिंगला पाथर्डी-शेवगाव (Pathardi Shevgav) राज्य मार्गावर फिरण्यासाठी गेल्या.
त्यावेळी शेवगाव रोडवरील गांधी हॉस्पिटलजवळ एडके वस्तीसमोर मीना नलवडे यांना त्यांच्या पाठीमागून वेगाने आलेल्या दुचाकीची जोरदार धडक (Hit) बसली. त्यामध्ये नलवडे यांच्या डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला. नलवडे यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू (Death) झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.