शेगाव | दिपक सुरोसे | Shegaon
बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) शेगाव रोडवरील (Shegaon Road) जयपूर लांडे फाट्यानजीक आज (बुधवारी) पहाटे तीन वाहनांचा विचित्र अपघात (Accident) होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. तर २४ प्रवाशी जखमी झाले असून यातील ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आधी एसटी बस व बोलेरो यांची समारोसमोर धडक झाली आणि याचवेळी मागून भरधाव वेगात येणारी ट्रॅव्हल्स एसटी बसवर धडकल्याने हा भीषण अपघात झाला. यानंतर अपघातातील जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात (Hospital) भरती करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘आज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास बोलेरो(क्र.एमएच २८एझेड ३३९४) शेगाववरुन खामगावकडे (Khamgaon) भरधाव वेगात निघाली होती. यावेळी जयपूर लांडे फाट्यानजीक ब्रम्हांडनायक लॉन्ससमोर खामगावकडून परतवाडाकडे जाणाऱ्या एसटी बस (क्र. एमएच १४ एलबी २३४४) वर सदर बोलेरो धडकली. याचवेळी एसटी बसच्या मागून भरधाव वेगात येणारी नाशिक-अमरावती इंदाणी ट्रॅव्हल्स (क्र.एमएच १५ इएफ ४०४१) अपघातग्रस्त एसटी बसवर शेगाव रोडवर मागून जोरात धडकली.
दरम्यान, या तिहेरी विचित्र अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २४ प्रवाशी जखमी झाले. यावेळी इतर वाहनधारकांनी धावपळ करत जखमींना तत्काळ बाहेर काढून सामान्य रुणालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच या अपघातामुळे काही काळ या रोडवरील वाहतूक खोळंबली होती. हा अपघात इतका भीषण होता की, बोलेरोचा चेंदामेंदा झाला असून एसटी बस व ट्रॅव्हल्सचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
या विचित्र अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील काहींना अकोला तर काहींना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. यातील दोन जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इतर किरकोळ जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जखमींना प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. तसेच जखमींमध्ये काही महिला व लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीमुळे झाला याबाबत अद्याप समजू शकलेले नसून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
जिल्हाधिकारी पाटील यांनी केली जखमींची विचारपूस
शेगाव मार्गावरील जयपूर लांडे फाट्याजवळ आज (बुधवारी) पहाटे भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी संवेदनशीलता दाखवत घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करून आरोग्य यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जयपूर लांडे फाट्यावरील अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी खामगाव येथील शासकीय रुणालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली.
अपघातातील मृतांची नावे
या भीषण अपघातात बोलेरोमधील शिवाजी समाधान मुंडे (४२) रा. शेगाव, शिवपाल (३२) रा. मध्यप्रदेश, धनेश्वर मरावी (३०) रा. मध्यप्रदेश, मोहनसिंह सरोदे (२०) रा. मध्यप्रदेश व ट्रॅव्हल्स मधील महेसनिसा शेख हबीब (४५) रा. धुळे, मालेगाव
अपघातातील जखमींची नावे
शिव धनसिह धुर्वे (४७) रा.मध्य प्रदेश, कोमल गणेश गंधारे (५९) रा. अहमदनगर, प्रतीक्षा मुकुंदराव वांगे (२६) रा. ब्राह्मणवाडा थळी, ता. चांदुर बाजार अमरावती, सत्त्यपाल गुलाबराव गबई (४०) रा. लावखेड तालुका पातुर जिल्हा अकोला, सुमन सुखदेवराव भोंडे (७०) रा. अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती, सुखदेव अमृत भोंडे (८१) रा. अंजनगाव सुर्जी, दत्ता रामधन मोरखडे (४५) रा. हिवरखेड रुपराव ता. तेल्हारा, बापूराव रामकृष्ण सवाने (८०) रा.वड़ार मेग ता. निफाड जिल्हा नाशिक, साजिया परवीन शेख हबीब (१०) रा. धुळे मालेगाव, शेख हबीब अब्दुल रजाक (५०) रा. धुळे मालेगाव, रंजीत वानखेडे (४०) रा.मूर्तिजापूर, धनराज नागोराव उगले (३७) रा. बिलोरा विमानतळ अमरावती, आशिष सुखदेवराव नवले (४०) रा.अमरावती, प्रल्हादराव शिवरामजी आवंडकर (७५) रा. अंजनगाव सुर्जी, वरद चित्रांगण रेवंदले (६वर्ष) रा. फुरसुंगी बाग पुणे, वंदना देवानंद पांडवकर (५१) रा. अंजनगाव सुर्जी, पुरुषोत्तम नारायण शिनकर (७२) रा. करजगाव ता. चांदर बाजार, सौ.शालिनी पुरुषोत्तम शिनकर (६५) रा. करजगाव ता. चांदूरबाजार