Monday, July 1, 2024
Homeनगरविटाचा ट्रक उलटला; एक ठार, तीन गंभीर जखमी

विटाचा ट्रक उलटला; एक ठार, तीन गंभीर जखमी

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangav Deshmukh

- Advertisement -

कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर रांजणगाव देशमुख हद्दीत विटाचा ट्रक उलटून एकजण ठार झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोणी येथे उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली.
विटाने भरलेला ट्रक (क्रमांक-एमएच 12 ईएफ 1126) हा संगमनेरच्या दिशेने जात होता.

रांजणगाव देशमुखच्या मिंधे वस्तीनजिक या ट्रकचे मागील टायर फुटल्याने हा ट्रक उलटला असावा असा अंदाज आहे. ट्रकमध्ये चालकासह आठ जण होते. त्यातील चार जण विटावर बसलेले होते. ते विटाखाली दबले गेले.स्थानिकांनी त्या विटाखाली दबलेल्यांना वर काढून दवाखान्यात पाठवून दिले. ते सर्वजण गंभीर जखमी होते. त्यातील एकजण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला तर तिघांवर उपचार सुरू आहेत. हे कामगार परप्रांतीय असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या