Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident News : महाकुंभातून परतताना भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Accident News : महाकुंभातून परतताना भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

प्रयागराज येथील कुंभमेळ्याला (Kumbh mela) जाऊन गंगास्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र,या भक्तीमार्गाच्या प्रवासात अपघाताच्याही (Accident) घटना घडल्या आहेत. अशातच आज (सोमवारी) पहाटे मध्यप्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यातील (Jabalpur District) सिहोरा येथे अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,”जबलपूरमध्ये एक अनियंत्रित जीप (Car) चुकीच्या बाजूने जाऊन झाडाला धडकली. यानंतर ही जीप बसला धडकली. त्यात जीपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. हे सर्वजण प्रयागराज (Prayagraj) महाकुंभातून कर्नाटकला परतत होते.

YouTube video player

भालचंद्र नारायण गौडर (वय ५०, रा. गोकाक,) सुनील बाळकृष्ण शेडशाळ (वय ४५, रा. हत्तरकी -आनंदपुर गोकाक), बसवराज निरपादप्पा कुर्ती (वय ६३, रा. गोकाक), बसवराज शिवाप्पा दोडमणी (वय ४९, रा. गोकाक), इराण्णा शंकराप्पा शेबिनकट्टी (वय २७, रा. गुळेदगुड्ड) आणि वीरूपाक्ष चन्नाप्पा गुमती(वय ६१, रा. गोकाक) अशी अपघातात (Accident) मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे आहेत. तर मुस्ताक शिंधिकुरबेट आणि सदाशिव उपदली हे अपघातात गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त जीपचा नंबर केए ४९ एम ५०५४ असा असून ही जीप जबलपूरच्या दिशेने वेगाने जात होती. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावरील झाडावर आदळली. तसेच नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे दुभाजकावरील झाड तोडून चुकीच्या बाजूला गेली आणि जबलपूरहून कर्नाटककडे (Karnataka) जाणाऱ्या प्रवासी बसला धडकली. त्यामध्ये जीपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्या

Parner : पंतप्रधान संग्रहालयात अण्णांचा पत्रव्यवहार

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याची दखल आता पंतप्रधान संग्रहालयाने घेतली असून अण्णांनी सरकार दरबारी केलेला पत्रव्यवहार जतन केला जाणार आहे....