Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Accident News : कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,...

Mumbai Accident News : कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर

मुंबई | Mumbai

मुंबईतील (Mumbai) सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोडवर आज (रविवारी) पहाटे ५:२० च्या सुमारास भीषण अपघात (Accident) घडला. भरधाव वेगातील बीएमडब्ल्यू कारवरील (BMW Car) चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात लाला लजपतराय महाविद्यालयासमोर लोटस जेटीजवळ घडला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बीएमडब्ल्यू कार (मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने) अत्यंत भरधाव वेगात जात होती. लोटस जेटीजवळ (Lotus Jetty) आल्यावर कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या बाजूच्या रेलिंगला जोरात धडकून थेट पुलावरून खाली कोसळली. या भीषण धडकेत कारचा (Car) पार चेंदामेंदा झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन कारमधील चारही जणांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. या भीषण अपघातात शानय गज्जल (वय २१),धिर्या सेठ (वय १७) आणि एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक वीस वर्षीय तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर नायर रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ सील करून कार तांत्रिक तपासासाठी ताब्यात घेतली आहे. कारचा वेग किती होता आणि अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहे. दरम्यान, कोस्टल रोडवर वारंवार होणाऱ्या वेगाच्या उल्लंघनामुळे आणि या भीषण अपघातामुळे सागरी मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

शिंदे

एकनाथ शिंदेंनी भाजपकडून ५०० कोटी घेतल्याचा जरांगेंचा दावा…; शिंदे सेनेकडून पहिली...

0
मुंबई | Mumbaiबीडच्या नारायण गडावर आज मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचा दसरा मेळावा पार पडला. दसऱ्या मेळाव्यातील या भाषणातून मनोज जरांगे यांनी विविध...