Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकAccident : चार वाहनांचा अपघात; 13 मेंढ्या मृत्युमुखी

Accident : चार वाहनांचा अपघात; 13 मेंढ्या मृत्युमुखी

दहिवड । वार्ताहर Dahivad

मुंबई-आग्रा महामार्गावर राहुड घाटाच्या पायथ्याजवळ दोन बससह विटा व कांद्याने भरलेला ट्रक अशा चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात रस्ता ओलांडणार्‍या 13 मेंढ्या चिरडल्या गेल्या. दोन्ही बसमधील अनेक प्रवाशी किरकोळ जखमी होवून सुदैवाने बचावले. दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. तीव्र उतारामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

मुद्रांक शुल्कासाठी आता ५०० रुपये मोजावे लागणार; विधानसभेत विधेयक सादर

मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटाच्या पायथ्यालगत असलेल्या चिंचवडे गावालगत असलेल्या तीव्र उतारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकापाठोपाठ एक अशी चार वाहने एकमेकांवर धडकली. ठाणे डेपोची बस (एम.एच.-20-बी.एल.-3727) हिचा अतीवेग असल्यामुळे चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटले व समोर रस्ता ओंलडणार्या मेंढ्या चिरडत बस पुढे थांबली यावेळी ही बस प्रवाश्यांनी भरलेली होती. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांची सोय व्हावी म्हणून पाठीमागून येणारी बसं ( एम.एच.-14-के.क्यु. 0657) ही थांबविण्यात आली होती.

९८ व्या मराठी साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी केली संमेलन स्थळाची पाहणी

या बसमध्ये प्रवाशी चढत असतांना अचानक मागुन कांद्याने भरलेला ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक बसला मागुन येवून धडकला व नंतर पुढे विटाने भरलेल्या ट्रक (एम.एच.-15-इ.जि.-5967 ) ला धडक देत पलटी झाला. बससह ट्रकचा अपघातांचा आवाज झाल्याने स्थानिक नागरीकानी घटनास्थळी धाव घेत बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढत वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपनिरीक्षक कैलास गुजर, दामोधर काळे, चांदवड पोलीस निरीक्षक वाघ यांनी तातडीने भेट देत अपघातांमुळे विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...